पारोळा पोलिसांची कामगिरी : अनोळखी महिलेचा खूनाचा गुन्हा उघड : आरोपीला बेड्या
दागिण्यांच्या वादातून केली महिलेची हत्या : ओळख पटण्यासाठी डोक्यात घातला दगड

Parola police performance : Murder case of unknown woman solved : Accused in handcuffs पारोळा (29 जून 2025) : पारोळा पोलिस ठाणे हद्दीतील खून करून महिलेचा मृतदेह फेकण्यात आला होता. पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप व सहकार्यांनी कसब पणाला लावत महिलेची ओळख पटवली असून आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत. महिलेकडील दागिण्यांच्या वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे शिवाय अन्य बाबींबाबत पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. शोभाबाई रघुनाथ कोळी (48, उंदिरखेडा, ता.पारोळा) असे खून झालेल्या महिलेचे तर अनिल गोविंदा संदानशीव (46, सुमठाणे, ता.पारोळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अनोळखी महिलेची अखेर पटली ओळख
पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांकडून या महिलेची ओळख पटवण्यावर भर देण्यात आला होता. महिलेची ओळख पटवण्यात यश आल्यानंतर मृत ही उंदिरखेडा गावातील शोभाबाई रघुनाथ कोळी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे अनिल संदानशीव यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

यांनी केली गुन्ह्याची उकल
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश महाजन, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हेड कॉन्स्टेबल शरद पाटील, महेश पाटील, सुनील हटकर, आशिष गायकवाड, अनिल राठोड, संदीप सातपुते, अभिजीत पाटील, मिथुन पाटील, महेंद्रसिंग राजपूत, सविता पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.