जळगावात आठ हजारांच्या बनावट नोटांसह दोघे जाळ्यात


Two arrested with fake Rs 8,000 notes in Jalgaon जळगाव (29 जून 2025) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री 10 वाजता 500 रुपये किंमतीच्या आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक केली. आरोपींकडून दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन दरबारसिंग राजपूत (34, रा.रामेश्वर कॉलनी) व सचिन संजय गोसावी (23, रा.वाघ नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ दोन संशयित व्यक्ती 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला व रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिसांनी संशयीताना आठ हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या 16 बनावट नोटा, दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच 19 डीयू 7808) असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात दोन्ही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !