पोलिस अधिकार्याच्या हत्येने अमरावती हादरली !
दुचाकीने जात असताना सहा जणांनी रस्त्यात गाठून पोलिस अधिकार्याची केली हत्या

अमरावती (29 जून 2025) : चारचाकीने आधी धडक देत नंतर शस्त्राचे वार करून अमरावतीत पोलिस अधिकार्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकार्याच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण
एएसआय कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. दुचाकीवरून जात जात असताना त्यांच्या बाईकला एका फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. पाच ते सहा हल्लेखोर यामध्ये असल्याची माहिती असून ते पसार झाले आहेत.

हल्ल्यानंतर एएसआय कलीम यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी धाव घेतली.
हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस अधिकार्याच्या हत्येमुळे नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे..
पोलीस अधिकार्याची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी स्थानिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिस अधिकार्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हत्येचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.