आमदार अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश


MLA Amol Javale रावेर (30 जून 2025) : रावेर व यावल तालुक्यात रविावरी आलेल्या वादळी वार्‍यांमुळे शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तत्काळ पुढाकार घेत प्रशासनाला नुकसानग्रस्त गावांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि पदाधिकार्‍यांनी रावेर, यावल तालुक्यातील विवरे, चिनावल, रोझोदा तसेच यावल तालुक्यातील न्हावी या गावांना भेट देत, प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतली व परिस्थितीची पाहणी केली.









यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, तसेच सुरेश धनके, पद्माकर महाजन, सूर्यकांत देशमुख, वासू नरवाडे, प्रवीण वारके, पराग वाघुळदे आदी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार : आमदार जावळे
शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देत आमदार अमोल जावळे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !