ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार !

If the Thackeray brothers come together, Congress will fight on its own! मुंबई (30 जून 2025) : हिंदी सक्तीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत 5 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्याच्या तयारीत असतानाच सरकारने दोन्ही जीआर रद्द केले. त्यानंतर आता आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची आहे, त्यासाठी 7 तारखेला बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. आमचे सचिव व्यंकटेश आणि मी त्या बैठकीत सहभागी होणार आहोत. 7 तारखेला अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली.
अध्यक्षांशी चर्चा करूनच निर्णय
कार्यकर्त्यांनी भावना अशी आहे की, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढले पाहिजे. सर्व ठिकाणी उमेदवार दिले पाहिजेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. यावर अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आला. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारत असे काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसने मजबूत केले आहे. त्यांना अनेकदा संधी दिली आहे. काँग्रेस आपली विचारधारा घेऊन पुढे जाईल. जर राज ठाकरे सोबत येण्याबाबत काही होत असेल, तर त्याचे काय करायचे त्यावर नंतर विचार केला जाईल. अजून तरी ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे निश्चित झालेले नाही. परंतु, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत 7 तारखेला आम्ही निर्णय घेणार आहोत, असे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.