जळगावातील कुख्यात गुन्हेगार ‘टिचुकल्या’ स्थानबद्ध
Notorious criminal ‘Tichuklya’ from Jalgaon arrested जळगाव (1 जुलै 2025) : जळगावातील कुख्यात गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (26, रा. गणेशवाडी, तुकारामवाडी, जळगाव) यास नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गंभीर नऊ गुन्हे दाखल
आरोपीविरुद्ध भादंवि अंतर्गत तब्बल 9 गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा झोपडपट्टी दादागिरी, हातभट्टी विक्री, औषधद्रव्य संबंधी गुन्हे, व्हिडीओ पायरेटिंग, वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार यासारख्या गंभीर आणि समाजविघातक गुन्ह्यांमध्ये गुंतला असल्याने व त्याच्या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्थेला कायमची बाधा निर्माण झाल्याने त्यास स्थानबद्ध करण्यासाठी जिल्हा पेठचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी 16 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला.





पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण आदींनी याकामी सहकार्य केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 30 जून 2025 रोजी आदेश सचिन चौधरी यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
यांनी केली अंमलबजावणी
आदेश प्राप्त होताच जिल्हापेठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सहा.पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, हवालदार मिलिंद सोनवणे, हवालदार विकास पोहेकर यांनी आरोपीला कारागृहात दाखल केले.
