पंढरपूर दर्शनाला निघालेल्या अल्पवयीनावर अत्याचार : कोयता दाखवत दागिनेही लूटले
A minor who went to visit Pandharpur was tortured: He was also robbed of his jewellery while brandishing a sickle. पुणे (2 जुलै 2025) : विठ्ठलाच्या भेटीची आस बाळगून परिवारासह पंढरपूर निघालेल्या वारकर्यांना दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी कोयत्याचा धाक दाखवत लुटले व 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आहे.
कोयत्याच्या धाकावर अत्याचार
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गील यांच्या माहितीनुसार, कुटुंब पंढरपूरला निघाले असताना चालकाला चहा प्यायची असल्याने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवण्यात आली. यावेळी दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोने लुटलं. कोयत्याचा धाग दाखवत आरोपींनी कुटुंबाला धमकी दिली आणि त्यांच्याकडील सर्व दागिने घेतले तसेच त्यांच्यासोबत असणार्या 17 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केले. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला आहे.
पीडीताना मिळावा न्याय
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी मागणी केली की, संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा.




