भुसावळ शहरात सूर्यकन्येचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रम : तापी घाटावर साप्ताहिक सामूहिक आरतीचा निर्णय


Sai Nirmal Foundation initiative : Decision to hold weekly mass aarti at Tapi Ghat भुसावळ (2 जुलै 2025) : शहरातील साईनिर्मल फाउंडेशनतर्फे बुधवार, 2 जुलै रोजी तापी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमोदा येथील निर्मोही आखाड्याचे संत श्री कन्हैयादासजी महाराज, इस्कॉनचे प्रभू स्वामीजी, निसर्ग पर्यावरण मंडळाच्या स्वाती भोळे, लेवा सखी मंडळाच्या मंगला पाटील, सीताराम कन्स्ट्रक्शनचे भूषण वराडे, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, डॉ.सुनील पाटील, हिंदू जागरण मंचच्या प्रगती पाटील, जय गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते, बापू महाजन उपस्थित होते.

यावेळी पंच निर्मोही आखाड्याचे आमोदा येथील संत श्री कन्हैयादास जी महाराज (फैजपूर), इस्कॉनचे प्रभू स्वामीजी, निसर्ग पर्यावरण मंडळाच्या स्वाती भोळे, लेवा सखी मंडळाच्या मंगला पाटील, सीताराम कन्स्ट्रक्शनचे भूषण वराडे, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, डॉ. सुनील पाटील, हिंदू जागरण मंचच्या प्रगती पाटील, जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते, डॉ.तनुज पाटील, बापू महाजन, संस्थाध्यक्ष शिशिर जावळे यांच्यासह इतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते तापी नदीचे पूजन करून तापी नदीस महावस्त्र अर्पण करून सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी प्रास्ताविक केले. तापीचे महात्म्य आणि सनातन धर्म यावर पंच निर्मोही आखाड्याचे आमोद येथील संत कन्हैया दास महाराज यांनी मार्गदर्शन केले. इस्कॉनचे प्रभुस्वामिनी सुद्धा यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले.









साप्ताहिक आरतीचा निर्णय
यावेळी तापी घाट विकसीत करून तापी नदीतील प्रदूषण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि परिसर स्वच्छतेसाठी तापी नदीची सर्व 18 पगड जातीं धर्माच्या भक्तांना सोबत घेऊन साप्ताहिक आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यशस्वीतेसाठी मोहन कासार, ललित नेहेते, हितेंद्र कोलते, किरण पाटील, पवन चावरिया, विशाल बोरोले, अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.1







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !