अमळनेरात वेश्या व्यवसायावर धाड : सहा महिलांची सुटका, तीन महिलांविरोधात गुन्हा


Raid on prostitution business in Amalnerat : Six women rescued, case registered against three women अमळनेर (3 जुलै 2025) : अमळनेर पोलिसांनी गांधलीपुरा भागातील कुंटणखान्यावर छापा टाकून देह विक्रीचा व्यवसाय करणार्‍या तीन महिलांविरुद्ध ‘पिटा अ‍ॅक्ट’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला तर सहा पीडितांची सुटका करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच, त्यांनी तातडीने आपल्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.









यानुसार, अमळनेर पोलिस पथकाने मंगळवारी, 1 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घटनास्थळी डमी ग्राहक (बनावट ग्राहक) पाठवले. या ग्राहकांकडून देह विक्रीसाठी एक हजार रुपये घेतले जात होते आणि त्यातील 500 रुपये पीडित महिलांना दिले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा प्रकार स्पष्ट होताच, पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला.

या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 61 कंडोमची पाकिटे जप्त केली. तसेच, या ठिकाणाहून देह विक्रीसाठी अडकवून ठेवलेल्या सहा पीडित मुलींची (महिलांची) यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. पीडित महिलांना अडकून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने देह विक्रीचा व्यवसाय करून घेणार्‍या जुमाबाई (पूर्ण नाव अज्ञात), शशिकला मदन बडगुजर (30) आणि मीना दीपक मिस्तरी (60, तिघे रा.गांधलीपुरा, जळगाव) यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात ‘पिटा अ‍ॅक्ट’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !