आर्थिक गैरव्यवहार : सावदा मर्चंटच्या व्यवस्थापकाला बेड्या


Financial irregularities : Manager of Savda Merchant arrested सावदा (3 जुलै 2025) :आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सावदा येथील मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी याला सव्वा वर्षानंतर पोलिसांनी अटक केली.

बनावट पावत्यांसह दाखले तयार केल्याचा आरोप
सावदा पोलीस ठाण्यात 10 एप्रिल 2023 रोजी भारतीय दंड संहिता कलम 406, 420, 464, 465, 467, 468, 471 व 474 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांत वाणी यांनी संस्थेच्या सहा कर्जदारांकडून एकूण 8.50 लाख रुपये (मुद्दल व व्याजासह) वसूल करून बनावट पावत्या आणि दाखले तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम संस्थेच्या बँक खात्यात न भरता त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची गंभीर बाब तपासात समोर आली आहे.









गोपनीय माहितीवरुन कारवाई
संस्थेच्या महत्त्वाच्या नोंदी आणि कागदपत्रे वाणी यांनी स्वतःकडेच ठेवली होती आणि प्रशासकांना सुपुर्द न केल्यामुळे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने वाणी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने तो जवळपास एक वर्ष पसारर होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, हवालदार उमेश पाटील, हवलदार निलेश बाविस्कर, मयूर पाटील व गीता कदम यांच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे रसलपूर येथून त्याला अटक केली.

आरोपीला दहा दिवसांची कोठडी
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संस्थेचे तत्कालीन संचालक आणि काही माजी पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. काही प्रकरणांत तर बनावट तारण कागदपत्रे तयार करून बोगस बोजा दाखवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या सर्व प्रकारांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींविरोधात लवकरच कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस तपास पथकाने दिली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !