अधिकारी, कर्मचार्‍यांनो सावधान ! : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्यास होणार कारवाई


Officers and employees, beware!: Action will be taken if birthdays are celebrated in government offices मुंबई (3 जुलै 2025) : सरकारी कार्यालयांमध्ये अनेकदा अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा वाढदिवस साजरा केला जातो मात्र आता
शासकीय कार्यालयांमध्ये केक कापणार्‍यांवर कारवाई होणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या अनुषंगाने शासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. परिणामी यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्यावर मर्यादा राहणार आहेत.








अनेकदा कार्यालयीन वेळेतच अधिकारी वा कर्मचार्‍यांचे वाढदिवस साजरे केले जातात. केक कापण्याचे कार्यक्रम पार पडतात. भाषणांचे सत्रही रंगते. मात्र, या दरम्यान कार्यालयात आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जमावबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी परिपत्रक काढून संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शासनाच्या नव्या सूचनेनुसार, अशा कार्यक्रमांवर नियंत्रण येणार आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार सध्या वाढत चालले होते. कार्यालयीन वेळेत केक कापण्याचे कार्यक्रम रंगू लागले होते. परिणामी, कामासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागत होते. या प्रकारामुळे शासकीय कामकाजात व्यत्यय येत होता, तर नागरिकांच्या वेळेचेही नुकसान होत होते.

नागरी सेवा वर्तणूक नियम काय म्हणतो?
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 नुसार, शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत कोणताही वैयक्तिक, धार्मिक किंवा सामाजिक समारंभ साजरा करू शकत नाहीत. कार्यालयीन वेळ फक्त कामकाजासाठी वापरावी, वैयक्तिक कार्यक्रमांसाठी वेळ किंवा संसाधनांचा वापर निषिद्ध आहे.

केक वाटून सर्व विभागात सेलिब्रेशन
शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा खासगी कार्यक्रमांच्या निमित्ताने केक वाटप करून सर्व विभागांमध्ये सेलिब्रेशनचा माहोल निर्माण केला जातो. यामुळे कार्यालयीन शिस्त ढासळते आणि कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. कर्मचारी एकमेकांच्या कॅबिनमध्ये जाऊन केक वाटण्यात आणि शुभेच्छा देण्यात व्यस्त असतात.

कार्यालयीन वेळेत केक कटींग ; अल्पोपहारावर ताव
शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या वेळेत वाढदिवस साजरे करणे सामान्य झाले आहे. कर्मचारी केक कापणे, फोटो काढणे आणि अल्पोपहार घेण्यात व्यस्त असतात, तर नागरिक कामासाठी तासनतास वाट पाहतात. त्यामुळे कामकाजात विलंब होतो आणि सरकारी यंत्रणेवरील विश्वास घटतो.

नियम तोडल्यास काय होणार कारवाई ?
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार, शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कार्यक्रम किंवा अन्य अनधिकृत वर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. यात नोटीस देणे, योग्य ते दंड यांचा समावेश आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !