विवाहित प्रेमी युगूलाची रेल्वेखाली आत्महत्या : पाचोरा तालुक्यातील घटना


Married couple commits suicide under train : Incident in Pachora taluka पाचोरा (3 जुलै 2025) :  विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे ही घटना घडली. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे. योगेश रामदास ठाकरे (35) व मीना बबलू ठाकरे (28) अशी आत्महत्या करणार्‍यांची नावे आहेत.

प्रेम संबंधातून टोकाचे पाऊल
परधाडे येथील योगेश रामदास ठाकरे आणि मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. योगेशला त्याच्या पत्नीपासून तीन मुले आहेत तर मीनालाही तिचे पती बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत.








दोघेही घरांच्या काही अंतरावर राहत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, योगेशच्या पत्नीला आणि मीनाच्या पतीला या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांकडून याला मोठा विरोध होऊ लागला. यामुळे योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता.

गेल्या तीन दिवसांपूर्वीच परधाडे येथे योगेश परतला होता. त्यानंतर मंगळवार, 2 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोघांनी एकत्र घरातून पलायन केले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु बुधवार, 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास डाऊन साईटवरील रेल्वे किलोमीटर खांबा नंबर 384/25 दरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले.

परधाडे येथील गँगमनला ही घटना दिसल्यानंतर त्यांनी पाचोरा स्टेशन मास्तरला आणि रेल्वे स्टेशनच्या 34 भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळवली. ही घटना पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भगवान चौधरी पुढील तपास करीत आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !