एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांना अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न : शुभम पाटीलला अटक

Attempt to kill former Erandol mayor Dashrath Mahajan in an accident : Shubham Patil arrested जळगाव (3 जुलै 2025) : पूर्व वैमनस्यातून एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा अपघात दर्शवून ठार मारण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी घडला होता. कुटूंबियांच्या तक्रारीनंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित हल्ला असल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी सुरूवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आता चौथा संशयीत झिंग्या उर्फ शुभम दत्तात्रय पाटील (28, रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल) यास अटक करण्यात आली.
गुन्ह्यात बदकसह तीन अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (40), शुभम कैलास महाजन (19) आणि पवन कैलास महाजन (20, सर्व रा.एरंडोल) या तिन्ही आरोपींना अटक केली होती. आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतारकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिस तपासादरम्यान चौथा संशयीत झिंग्या उर्फ शुभम दत्तात्रय पाटील (28, रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल) याला अटक करण्यात आली.