जळगाव जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई : बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला बेड्या

Jalgaon District Peth Police action : Chhatrapati Sambhajinagar woman handcuffed in fake currency case जळगाव (3 जुलै 2025) : जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून महिलेला बनावट नोटांप्रकरणी अटक केली आहे. अटकेतील संशयितांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत तब्बल 24 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा वापरल्याचे समोर आल्याची माहिती आहे.
गुन्हे शाखेकडून यापूर्वी दोघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेने सचिन दरबारसिंग राजपूत (34) आणि सचिन संजय गोसावी (23) या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 27 रोजी ताब्यात घेत सहा हजार रुपये किंमतीच्या 12 बनावट नोटा जप्त केल्या. चौकशीदरम्यान या दोघांनी यापूर्वीच 24 हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्याची माहिती समोर आली.

जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच विजय प्रभुलाल माहोरे (38) यालाही अटक करण्यात आलीव माहोरेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथील कोकिळा रघुनाथ मंगरुळे ( 40) या महिलेकडून घेतल्याची कबुली देताच कोकिळा मंगरुळेला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.
