पाचोरा हादरले : तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या


Pachora shaken : Youth brutally shot dead पाचोरा (4 जुलै 2025) : पाचोरा बसस्थानकाच्या मुख्य गेटसमोर एका तरुणावर अज्ञात व्यक्तींनी सिनेस्टाईल गोळीबार करत त्याची हत्या केल्याने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. आकाश कैलास मोरे (26, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

काय घडले पाचोरा शहरात
सोमवार, 4 जुलै रोजी संध्याकाळी सव्वा सहा दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले आणि त्यांनी बसस्टॅण्डजवळ असलेल्या आकाश मोरेवर सिनेस्टाईल गोळ्या झाडत हल्लेखोरांनी पळ काढला. अचानक झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची धावपळ उडाली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन जागा सील केली. त्यांनी तात्काळ पंचनामा करून आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. शहरात नाकाबंदी सुरू असून मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.









पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबला घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे. पाचोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, खुनाचे कारण व हल्लेखोरांची नावे अद्याप अस्पष्ट आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !