भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थिनींची गर्दी

भुसावळ (5 जुलै2025) : शहरातील नामांकीत श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात जुलैच्या सुरुवातीस प्रवेश प्रक्रिेयेसाठी विद्यार्थिंनीची मोठी गर्दी वाढली आहे.
महाविद्यालयात प्रवेशाकरता विद्यार्थिनींमध्ये उत्साह दिसून येत आहे. महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.सी.ए. तसेच एम. एस. सी. केमिस्ट्री, एम.एस.सी.कॉम्प्युटर सायन्स, एम. ए. हिंदी, एम. ए. इंग्रजी व एम. कॉम. सारखे विषय आहेत. विद्यार्थिनींच्या सुविधा करता प्र. प्राचार्य डॉ. शरद अग्रवाल यांनी अॅडमिशन कमिटी स्थापन केली आहे.