बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त उद्या बाल वारकर्‍यांची दिंडी


जळगाव (5 जुलै 2025) : प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रातील संस्कृतीत पंढरपूरची वारी आणि संत वाङमयाची बालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि.6) रोजी आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकर्‍यांची’ व ‘संत वेशभूषा स्पर्धा’ या उपक्रमांचे आयोजन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

रविवार, 6 जुलै रोजी शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिर, मु.जे.महाविद्यालयाजवळ येथून सकाळी 7.30 वाजता दिंडी निघणार असून, पारंपारिक वेशभूषेतील बालके टाळ मृदंगाच्या तालावर या दिंडीत सहभागी होणार आहेत. तसेच दिंडीच्या समारोपानंतर वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी व त्याविषयी त्यांनी अभ्यास करावा याकरिता संत वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील बालकलावंत व बालप्रेक्षकांनी त्यांच्या पालकांसह बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांनी या दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व पदाधिकार्‍यांनी केले आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !