1 एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग

मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती


जळगाव (5 जुलै 2025) : मेरा युवा भारत केंद्र, जळगाव यांच्या वतीने एक पेड माँ के नाम या उपक्रमात गोदावरी व डॉ.केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या शंभर विद्यार्थ्यांसह केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती.

चोरवड, भुसावळ येथे आयोजित या उपक्रमात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव व डॉ.केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथून एकूण 100 विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री (राज्य) रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.









पर्यावरण संवर्धन व जनजागृती हा या अभियानाचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी मातृप्रेमाची जाणीव जपत झाडे लावून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या उपस्थितीत विद्यार्थीनींनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मेरा युवा भारत केंद्र व जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !