राज्यात पावसाचा जोर वाढणार : 5 ते 9 दरम्यान वादळी पावसाचा इशारा


Rains will increase in intensity in the state : Thunderstorm warning between 5 and 9 मुंबई (5 जुलै 2025) : राज्यात 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

5 ते 9 दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने एकत्रीतपणे जाहीर केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार 5 जुलै ते 9 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वार्‍यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वार्‍याच्या पावसाची हजेरी असेल.








संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे .

5 जुलै : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट तर मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट , कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली यलो अलर्ट

7 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, रायगड, भंडारा गोंदिया, नाशिक व सातार्‍याचा घाटमाथा

यलो अलर्ट : मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

8 जुलै : रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट

9 जुलै : तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट, नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !