भाजपा संकट मोचक म्हणाले : राज्यात लवकरच ‘राजकीय भूकंप’

BJP crisis solver said : ‘Political earthquake’ will happen soon in the state मुंबई (6 जुलै 2025) : तब्बल 20 वर्षानंतर मराठीच्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर विविध राजकीय चर्चा झडत असताना भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाबद्दल मोठा दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हणत आगामी काळात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी हा दावा केला आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
मंत्री महाजन म्हणाले की, त्यांच्याकडे कुणीही राहिलेलं नाही वा आमदारही नाहीत. ठाकरे गटातील अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यांचे खासदार देखील आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला तिकडे राहायचं नाही, अशी खासदारांची भूमिका आहे. तिकडे शेवटी काय आहे, बोल बच्चन अमिताभ बच्चन, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
