वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार !


Valmik Karad’s property will be confiscated! बीड (7 जुलै 2025) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणासह वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर निकाल देण्यासाठी 22 जुलै ही तारीख निश्चित केली. कोर्ट त्या दिवशी आपला निर्णय देईल.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आजच्या सुनावणीची माहिती दिली. ते म्हणाले, न्यायालय वाल्मीक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर येत्या 22 जुलै रोजी निकाल देणार आहे.

सरकारने या प्रकरणातील आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यासंबंधी एक अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद झाला. त्यावरही कोर्ट 22 जुलै रोजी निर्णय देणार आहे. विशेषतः या प्रकरणातील आरोपींनी आपल्या प्रॉपर्टीवर टाच आणली जाऊ नये असे अर्ज केले होते. त्यांच्या अर्जावर 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

वाल्मीक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. या प्रकरणी कोर्टात कोणताही अर्ज आला नाही. वाल्मीक सध्या बीड जिल्हा कारागृहातच आहे. वाल्मीकला कोणत्या तुरुंगात ठेवणे अधिक सुरक्षित राहील याबाबत मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे. तुरुंग प्रशासनच यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल. तूर्त याविषयी कोर्टात अर्ज दाखल झाला नाही किंवा कोर्टानेही आमच्याकडे तशी विचारणा केली नाही, असे अ‍ॅड.उज्ज्वल निकम म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !