मंत्री संजय सावकारे यांना फेसबुक लाईव्हद्वारे शिविगाळ : डाेंंबिवलीच्या भूषण पाटीलला बेड्या


Minister Sanjay Savkare was insulted via Facebook Live: Bhushan Patil of Dombivli was handcuffed भुसावळ (7 जुलै 2025) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी शनिवार, 5 जुलै रोजी फेसबुक लाईव्ह करून साकेगावातील रहिवासी व डोंबिवलीस्थित भुषण पाटील नामक मनोविकृताने गरळ ओकून अवमान जनक भाषा वापरली होती. याप्रकरणी आरोपीविरोधात वरणगावसह भुसावळ पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे नेमके प्रकरण
वरणगाव पोलिसात दिलीप सुरवाडे (ओझरखेडा) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी भूषण बी.पाटील विरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत भूषण पाटील नामक व्यक्तीने 5 रोजी फेसबुक लाईव्ह करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला शिवाय मंत्री संजय सावकारे यांच्याविषयीदेखील जातीवाचक अपमानजनक अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोन गुन्हे
भुसावळ बाजारपेठ पोलिसात भूषण पाटील विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी दाखल केली आहे. भूषण पाटील या संशयीताने 5 रोजी लहान बंधू व मंत्री संजय वामन सावकारे यांच्या विषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करून त्यांची बदनामी केली तसेच आमचे दैवत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

दुसरी तक्रार माजी नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी दाखल केली आहे. आरोपी भूषण पाटील (डोंबिवली) याने आमच्या समाजाबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य केले तसेच अश्लील शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.

बाजारपेठ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
अटकेतील आरोपी भूषण पाटील यास ताब्यात देण्याच्या मागणीसाठी भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली. आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !