संस्कृत सप्ताहाचा समारोप

जळगाव (7 जुलै 2025) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे गेले आठ दिवस संस्कृत भाषा सप्ताहाचा समारोप विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भाषिक कार्यक्रमांनी करण्यात आला.
समारोप प्रसंगी डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मिश्रा आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरचे अधिष्टाता डॉ हर्षल बोरोले यांची उपस्थीती होती.
मान्यवरांनी संस्कृत भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले.अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी प्रेरित केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत विविध सांस्कृतिक सादरीकरणे गीत, नृत्य, श्लोक वाचन आणि लघुनाटिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे शिक्षकांनी देखील संस्कृत भाषेत गायन सादर करून उपस्थितांचे मनोबल वाढवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे व संस्कृत प्रेमाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. सदस्य डॉ. वैभव पाटील व प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. संपूर्ण सप्ताहात संस्कृत भाषा प्रचारासाठी घेतलेले विविध उपक्रम आणि उत्सवमय वातावरण या समारोपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेची आवड निर्माण करणारा हा सप्ताह उत्साहात समारोप करण्यात आला.
