राज्यातील महानगरपालिका व पालिकांच्या निवडणुका कधी ? समोर आली ‘ही’ अपडेट माहिती

When will the elections for the municipal corporations and municipalities be held in the state? This updated information has come to light. मुंबई (7 जुलै 2025) : राज्यातील महानगरपालिका व पालिकांच्या निवडणुका कधी होणार ? याबाबत विविध चर्चा झडत असताना नवीन माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावल असून 10 रोजी ही बैठक होत आहे.
व्हीसीद्वारे होणार 10 रोजी बैठक
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला जाणार आहे.
आयोगाने काढले परिपत्रक
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्व तयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.
1. निवडणुका घेण्यात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था
2. मतदार संख्या
3. मतदान केंद्र
4. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (एतच्)
5. आवश्यक मनुष्यबळ
6. वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे
राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
