25 हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

Talathi caught by ACB while taking bribe of Rs 25,000 अहिल्यानगर (7 जुलै 2025) : अवैधरित्या वाळू वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना कनोली, ता.संगमनेर तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांना अहिल्यानगर एसीबीने अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
39 वर्षीय तक्रारदाराच्या ग्रामपंचायत शिवारात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थीला शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यात आलेली आहे. ही वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी यातील तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाहने यांना तहसीलदार संगमनेर यांनी मंजुरी दिलेली आहे. तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत असताना तलाठी शेलार याने तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणार्या वाहनधारकांना अगर तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला 30 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल व कारवाई टाळायची असेल तर 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी करीत असल्याबाबत 7 रोजी तक्रार दिली व पडताळणीत 25 हजार लाच मागणीचे सिद्ध झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, चालक हवालदार हरून शेख, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक आदींनी हा सापळा यशस्वी केला.
