जिल्हा वासीयांसाठी खुशखबर ! गिरणा धरणात 44 जलसाठा

Good news for the residents of the district! 44 water reservoirs in Girna Dam जळगाव (8 जुलै 2025) : जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवार, 8 जुलै रोजी सकाळपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा 44 टक्क्यांवर पोहोचला आहे.
संततधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ
नाशिकसह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणार्या गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा 44 टक्क्यांवर पोहोचला आहे. गिरणा पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यदृष्टीमुळे आवक वेगाने सुरू असल्याने हा साठा लवकरच 50 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

सोमवार, 7 जुलै रोजी सकाळी गिरणा धरणातील जलसाठा 41.18 टक्क्यांवर होता. शनिवारी आणि रविवारी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे गिरणा धरणाच्या वरच्या भागात असणार्या चणकापूर, पुनद, केळघरसह अन्य प्रकल्पांत मोठा जलसाठा उपलब्ध झाला आहे. जुलै महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा सरासरी ओलांडत असल्याने संबंधित प्रशासनाने केळघर आणि ठेंगोळा प्रकल्पांतून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत गिरणा धरणात 44.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी गिरणा धरणात 11.74 टक्के जलसाठा शिल्लक होता मात्र यंदा जोरदार पाऊस झाल्याने गिरणा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या गिरणा पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यदृष्टीमुळे आवक वेगाने सुरू पुढील 24 तासात गिरणा धरणातील जलसाठा 50 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आगामी काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.