आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला धो धो धूतले

MLA Sanjay Gaikwad thrashed the canteen driver मुंबई (9 जुलै 2025) : आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचार्याला जोरदार चोपल्याने खळबळ उडाल्यानंतर या प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या व्हिडीओनंतर आता आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या कॅन्टीनवर सरकारची मेहेरबानी का ?
आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण अंजता कॅटर्स हे अनेक वर्षांपासून ते कॅन्टीन चालवत आहेत. मुदत संपल्यानंतर ही पाच वर्षांपासून हे कॅटर्स का सुरू आहे त्यामुळे नियमांना बगल देत अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय असलेल्या कॅटर्सवर सरकार मेहरबान असल्याचं बोललं जात आहे.

कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर न काढता वाढीव मुदत
कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर मनोरा आमदार निवासात होत मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवास देण्यात आलं. आकाशवाणी आमदार निवास 2018 ला चालवायला दिल होतं, यांची मुदत 2020 पर्यंत होती. मात्र 2020 पासून ते आतापर्यंत टेंडर न काढता वाढीव मुदत देण्यात आली. त्यामुळे हे टेंडर का काढलं नाही? असा प्रश्न समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचार्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. कर्मचार्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा…अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता परंतु मारहाण करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही. अशा मारहाणी मुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले.