स्पा सेंटरआड सुरू होता वेश्या व्यवसाय : 18 तरुणींची सुटका


Prostitution was going on outside a spa center : 18 young women rescued पुणे (9 जुलै2025)  : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू भागांत स्पा सेंटरच्या आड देह व्यापार चालवले जात असताना पुणे पोलिसांनी कारवाई करीत बाणेर आणि विमानतळ परिसरात 18 मुलींची सुटका केली. यामध्ये 10 हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणार्‍या वेश्याव्यवसायाच्या साखळीचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

स्पा सेंटरवर कारवाई
विमानतळ परिसरात असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून 16 मुलींची सुटका केली. यामध्ये 10 परदेशी मुलींचा समावेश असून उर्वरित सहा भारतीय मुली आहेत. स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर आणि जागा भाड्याने देणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. हे स्पा बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसायासाठी वापरले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.



बाणेरमध्येही कारवाई
बाणेर परिसरातील एका उच्चभ्रू स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. येथे 2 मुलींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरचे मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, ग्राहकांकडून ‘मसाज’च्या नावाखाली मोठ्या रकमांची वसुली करून देह व्यापार केला जात होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !