प्रभू रामचंद्रांच्या संबंधित स्थळ दर्शनासाठी रेल्वेतर्फे ‘रामायण यात्रा’ विशेष गाडी
18 दिवसांचा राहणार प्रवास : दिल्लीतून सुरवात
The journey will last 18 days: Starting from Delhi भुसावळ (9 जुलै 2025) : प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्याशी संबंधित पवित्र स्थळांना भेट देण्यास उत्सुक असलेल्या सर्व भाविकांसाठी भारतीय रेल्वे एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. भारतीय रेल्वेचा एक उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम, येत्या 25 जुलै रोजी दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून अयोध्या ते रामेश्वरम पर्यंत ‘रामायण यात्रा’ ट्रेन सुरू करणार आहे. ही ’रामायण यात्रा’ भगवान रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देऊन आपला आध्यात्मिक प्रवास समृद्ध करू इच्छिणार्या सर्वांसाठी एक अद्भुत संधी आहे.
हा विशेष रामायण प्रवास भगवान रामाच्या जीवनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देण्याची एक अनोखी संधी रेल्वेतर्फे प्रवाशांना उपलब्ध करून देईल. 16 रात्री आणि 17 दिवसांचा हा प्रवास भाविकांना अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, सीतामढी, जनकपूर (नेपाळ), श्रृंगवेरपूर, नाशिक, हम्पी ते रामेश्वरम पर्यंतचे दर्शन घडवेल.
प्रवासाचा पहिला थांबा अयोध्या असेल, जिथे प्रवाशांना राम जन्मभूमी मंदिर, हनुमान गढी आणि राम की पैडी पाहता येईल. त्यानंतर, नंदीग्राममध्ये भरत-हनुमान मंदिर आणि भरत कुंडचे दर्शन होईल. शेजारील नेपाळमध्ये, जनकपूर येथील राम-जानकी मंदिर,धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड पहाणार आहे. बिहारमधील सीतामढी येथे जानकी मंदिर आणि पुनौरा धामला भेट दिली जाईल, तर बक्सरमध्ये राम रेखा घाट आणि रामेश्वर नाथ मंदिर पाहता येईल.
पवित्र शहर वाराणसीमध्ये, भाविकांना तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर आणि मनमोहक गंगा आरतीचा अनुभव घेता येईल. उत्तर प्रदेशातील सीतामढी येथे सीता समाहित स्थळच्या (सीता माता मंदिर) दर्शनानंतर, गाडी प्रयागराजला पोहोचेल जिथे त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर आणि भारद्वाज आश्रम पाहण्याची संधी मिळेल.
ही आध्यात्मिक यात्रा श्रृंगवेरपूरमधील श्रृंग ऋषी मंदिर, चित्रकूटमधील गुप्त गोदावरी, राम घाट आणि सती अनुसूया मंदिर पर्यंत सुरू राहील. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पंचवटीचे (सीता गुंफा आणि कालाराम मंदिर) दर्शन होईल. कर्नाटकातील हम्पीमध्ये अंजनाद्री टेकडी, विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर पाहिल्यानंतर, ही यात्रा अखेरीस रामेश्वरमला पोहोचेल जिथे भाविक रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडीचे दर्शन घेतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, या संपूर्ण प्रवासात गाडीमध्ये चहा,नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे शाकाहारी भोजन दिले जाणार आहे.
प्रवासाचे मुख्य तपशील
प्रवासाचे नाव- श्री रामायण यात्रा, कालावधी 16 रात्री 17 दिवस असेल, प्रवासाचा मार्ग असा- दिल्ली -अयोध्या -जनकपूर – सीतामढी -बक्सर – वाराणसी – प्रयागराज – श्रृंगवेरपूर – चित्रकूट – नाशिक – हम्पी – रामेश्वरम – दिल्ली. तसेच बोर्डिंग स्टेशन हे दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद,अलीगढ, टुंडला जंक्शन. इटावा, कानपूर, लखनऊ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा येथे राहणार आहे. हा प्रवास 25 जुलैला सुरू होईल,




