बेकायदा चर्चमधून आदिवासींचे धर्मांतर ! : धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांची लक्षवेधी : अनधिकृत चर्च पाडण्याची महसूल मंत्र्यांची ग्वाही
Conversion of tribals from illegal churches ! : Dhule MLA Anup Agarwal’s attention: Revenue Minister’s assurance of demolition of unauthorized churches मुंबई (10 जुलै 2025) : धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आदिवासी बांधवांच्या धर्मांतराचा मुद्दा मांडून सभागृहाचे लक्ष वेधत नवापूर तालुक्यात तब्बल 199 बेकायदा चर्च असल्याचे सांगत लक्षवेधी सूचना मांडली. यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनधिकृत चर्च तातडीने पाडण्याची ग्वाही देत ज्या चर्चच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांची विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सभागृहात सांगितले.
धर्मांतर झालेल्यांना पुन्हा परत आणण्यासाठी समिती
धर्मांतर झाल्यानंतरही त्या-त्या समाजाच्या सवलती घेतल्या जातात. ते धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्मांतर झालेल्या आदिवासी बांधवांना परत आणण्यासाठी आदिवासी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील सर्व आदिवासी आमदारांची एक समिती गठित करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
आदिवासी लोकांना धर्मांतरानंतर पुरावा देत नाहीत
आदिवासींमधून ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्या आदिवासींना कोणताही कागदोपत्री पुरावा दिला जात नाही. 12 राज्यांत धर्मांतर बंदीचा कायदा लागू आहे. महाराष्ट्रात हा कायदा कधी लागू होईल? राज्यातील अतिक्रमण केलेले चर्च कधी पाडण्यात येईल? ज्यांनी हिंदू प्रलोभनात येऊन धर्मपरिवर्तन केले आहे त्यांना परत कसे आणता येईल आणि त्यासाठी सरकार काय करणार? असा प्रश्न आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला.
बेकायदा चर्चसाठी विदेशातून पैसा
या चर्चच्या बांधकामासाठी विदेशातून पैसा येतो. गेल्या वर्षी 1515 संस्थांना विदेशातून पैसा आला. धर्मांतरावर कारवाईची जबाबदारी गृह विभागाला दिली आहे मात्र पोलिसांवर कामाचा ताण असतो. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यासाठी विशेष विंग तयार करणार का, असा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.




