गोदावरी स्कूलमध्ये गुरूपौर्णिमेचा उत्साह
जळगाव (11 जुलै 2025) : गोदावरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास ऋषीमुनी व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारे भाषण दिले. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्व दर्शवणारे गीत, कविता आणि नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी गुरूंचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.





