30 महिलांचा लैंगिक छळ : नाशिक जि.प.च्या विभाग प्रमुखाचे निलंबन
Sexual harassment of 30 women: Nashik ZP department head suspended नाशिक (11 जुलै 2025) : नाशिक जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाकडून 30 हून अधिक महिलांचा लैंगिक छळ आल्याच्या तक्रारीनंतर या विभागप्रमुखाचे निलंबन करण्यात आले आहे.
पुराव्यांसह तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणांची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या विभागप्रमुखाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.





नाशिक जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखाने अधिकाराचा गैरवापर करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं. अधिकार्याच्या पदाच्या दबावामुळे संबंधित महिला पुढे येऊन तक्रार करण्यास चाचरत होत्या मात्र त्या अधिकार्याबाबतची पहिली तक्रार प्राप्त झाली आणि इतर पीडित महिलांनीदेखील तक्रारी केल्या.
पीडित महिलांपैकी काहींचा गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ छळ सुरू होता. या अधिकार्याने विविध पदांवर असताना त्या-त्या कार्यालयातील, कामाशी संबंध असलेल्या महिला कर्मचार्यांना कामाचा धाक, काही वेळा आमिष दाखवत जाळ्यात अडकवलं होतं.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचार्यांचा मानसिक व लैंगिक छळ झाल्याच्या गंभीर तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ज्या अधिकार्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला आजच निलंबित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.
