सोने होणार स्वस्त : ग्राहकांनो पैसे राखून ठेवा !

नजीकच्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण शक्य


Gold will become cheaper : Consumers, save your money ! नवी दिल्ली (13 जुलै 2025) : नजीकच्या काळात सोन्याचे दर कमी होऊ शकतील, असा अंदाज आहे. रिपोर्टमधील दाव्यानुसार जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये वाढ झाल्यास सोन्याच्या दर आणखी घसरु शकतात. केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मागणी कमी झाल्यास त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो.

नोव्हेंबर 2022 मध्ये दर निचांकी पातळीवर
शुक्रवारी सोन्याचे दर 97 हजार 511 रुपये प्रति तोळा इतके होते. सध्या सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. 2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक तोळे सोन्याचा दर 20 हजारांपेक्षा जास्त रुपयांनी वाढला आहे तर चांदीच्या एक किलोचा दर देखील 20 हजारांपेक्षा अधिक रुपयांनी वाढला आहे.






अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेक जणांनी सोने खरेदी केली. 3 नोव्हेंबर 2022 ला सोन्याचा दर जागतिक बाजारात निचांकी पातळीवर होता. त्या दिवशी सोन्याचे दर निचांकी पातळीवर म्हणजे 1429 अमेरिकन डॉलर प्रति औंस इतके होते. त्यामध्ये दुप्पट वाढ होऊन सध्या सोन्याचे दर 3287 अमेरिकन डॉलर प्रति औंस इतके झाले आहेत म्हणजेच प्रतिवर्ष 30 टक्के सीएजीआरनं दरवाढ झाली आहे.

अभ्यासात या गोष्टीचा खुलासा
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनं यापूर्वी सोन्याचे दर घटले होते तेव्हा काय घडलं होतं याची माहिती घेत अभ्यास केला. त्यामध्ये काऊन्सिलला काही गोष्टी आढळल्या, त्या म्हणजे जगभरात राजनैतिक आणि व्यापारी स्थिती शांततेची असेल, तेव्हा सोन्याची मागणी कमी होते. याशिवाय अमेरिकन डॉलरची किंमत वाढते किंवा ट्रेजरी यील्डमध्ये वाढ होते तेव्हा सोन्यावर दबाव वाढतो. केंद्रीय बँका सोने खरेदी कमी करतात, गुंतवणूकदार देखील खरेदी कमी करतात तेव्हा सोन्याचे दर कमी होतात.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !