पालिका निवडणूक : पदाधिकारी, कार्यकर्त्यांनो कामाला लागा : अजित पवार


Municipal elections: Office bearers, workers, get to work : Ajit Pawar पुणे (13 जुलै 2025) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो? याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत व त्यातच राज्यातील महायुती सरकार युती करणार की स्वबळावर लढणार याबाबतही संभ्रम असताना पुण्यात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, मात्र प्रत्येक प्रभागात तयारी करा. पुण्यात आपल्याकडे संख्या फार चांगले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवून नोंदणी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

या संदर्भात आपण ऑगस्ट महिन्यात आढावा घेणार असून नवीन शहराध्यक्षांना कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील अजित पवार यांनी केल्या.






राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी
चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार तीन टप्प्यांत निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले होते.

राज्यातील 29 मनपा, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. महिनाभरापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवले होते. त्यात 40 दिवसांत म्हणजे जून अखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण, गट रचना करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात सर्वच पक्ष स्वबळावर तयारी करत असतात. तशी काँग्रेस पक्षाची देखील तयारी असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील म्हटले होते. इतकेच नाही तर महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष म्हणजेच मनसेला घेण्यासंदर्भात हाय कमांड निर्णय घेतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !