यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार : तरुणाविरुद्ध गुन्हा


Rape of minor girl in Yaval taluka : Crime against youth यावल (14 जुलै 2025) : यावल तालुक्यातील एका गावातील ल 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर एका तरूणाने बलात्कार केला व नंतर तिला मुक्ताईनगरातील जंगलात पळवून नेले. तिथेदेखील तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारी 2025 ते जून 2025 दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दुसखेडा येथील तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण
यावल तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत असताना चेतन अमोल सोनवणे (रा.दुसखेडा, ता.यावल) याने लग्नाचे आमिष दाखवले व तिच्यावर वीट भट्टीभागात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिला पळवून तो मुक्ताईनगरच्या जंगलात नेले. तिथेदेखील तिच्यावर लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला.


घडलेला प्रकार या अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध फैजपूर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !