किनगावात मागील भांडणाच्या कारणावरून दोघांना चौघांची मारहाण

कोयत्याने केली दुखापत : यावल पोलिसात गुन्हा दाखल


Two men beaten up by four people in Kingaon over a previous fight यावल (14 जुलै 2025) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात मागील भांडणाच्या कारणावरून 22 वर्षीय तरुण व त्याच्या काकाला चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली. कोयत्याने मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

किनगाव बुद्रुक, ता.यावल या गावात बाळू कोळी व सुभाष कोळी यांच्या घराच्या समोर मागील भांडणाच्या कारणावरून तेजस मुरलीधर कोळी (22) या तरुणाला तसेच त्याच्या काकाला आकाश कैलास कोळी, दीपक कैलास कोळी, कैलास नामदेव कोळी व गायत्री आकाश कोळी या चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली.


कोयत्याने तरुणाला मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !