चाळीसगाव तालुक्यात पाव विक्रेत्याचा अपघाती मृत्यू


Accidental death of bread vendor in Chalisgaon taluka चाळीसगाव (14 जुलै 2025) : पाव विक्रीसाठी जाणार्‍या सायकलला मागून चारचाकी वाहनाने जोरदारपणे धडक दिली. त्यात सायकलस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यात जबर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना 12 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान राींजणगाव येथे घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

असा घडला अपघात
मोहम्मद सैहनूर खान यांनी सांगितले की, 12 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आपण तसेच जावेद अन्वार खान असे रांजणगाव गावी पाव विक्रीसाठी सायकलने जात असताना चारचाकी (एमपी09/एएच-2733) वरील चालक अक्षय सुभाष ससाने (देवास नाका, इंदौर, मध्यप्रदेश) याने गाडी भरधाव वेगात चालवून वेग नियंत्रित न झाल्याने सायकलवर पाव विक्रीसाठी जाणारे जावेद अन्वार खान (36, चाळीसगाव) यांच्या सायकलला मागून ठोस मारल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !