जळगावातील दोन गुन्हेगार हद्दपार !

Two criminals from Jalgaon deported! जळगाव (14 जुलै 2025) : जळगाव शहरातील दोघांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी काढले.
या संशयीतांविरोधात कारवाई
शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरातील रहिवासी नीलेश नरेश हंसकर याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या शिवाय इंद्रप्रस्थनगरातील दीपक दगडू भोई याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या दोघांकडून आणखी काही गंभीर गुन्हा घडू शकतो, त्यामुळे दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव अनुक्रमे शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी चौकशी करून अहवाल पाठविला होता.
22 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित
हद्दपारीचे एकूण 32 प्रकरणे प्रस्तावित असून त्यातील दोन प्रकरणांना मंजुरी मिळाली. 22 प्रकरणे उपविभागीय पोलिस अधिकार्यांकडे चौकशीसाठी प्रलंबित आहेत तर उपविभागीय दंडाधिकार्यांकडे आठ प्रकरणे आहेत.
