वावड्या उठवणे बंद करा ; प्रत्येक पक्षातील नेत्यांशी चांगलेच संबंध : जयंत पाटील
State President Jayant Patil मुंबई (14 जुलै 2025) : आपले भाजप नेत्यांशी चांगले संबंध असून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो की भाजपमध्ये चाललो, असे नाही. मगाशी मी उपमुख्यमंत्री शिंदें नाही भेटलो, कुणाला तरी भेटलो म्हणून बातम्या करणे थांबायला हवे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू असतानाच पक्षाने चर्चा फेटाळली मात्र या दाव्यानंतर जयंत पाटील यांनी याबाबत स्वत: पुढे येऊन आपली भूमिका मांडली. आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामादेखील दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.





भाजपात जाणार नाही : संबंध मात्र सर्वांशीच
जयंत पाटील म्हणाले की, भाजपने माझाशी काही संपर्क केलेला नाही, माझे सर्वांशी चांगले संबं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, मंगळवार, 15 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसाधारण बैठक बोलावली असून दुपारी तीन वाजता बैठक होत असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले.
पाटलांचं ठरलं, पण कशावरुन अडलं अशा बातम्या चालत असल्याचं जयंत पाटील यावेळी ते म्हणाले. मी या बातम्या लगेच नाकारत नाही, कारण अशा बातम्या सातत्याने येतात. मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करणारा कार्यकर्ता आहे. मी शरद पवार यांच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी सांगत प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे वृत्तदेखील फेटाळले.
