महिलेवर सामूहिक बलात्कार


Gang rape of a woman अहिल्यानगर (15 जुलै 2025)  : महिलेशी असलेल्या वादानंतर संशयीताने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव परिसरात घडली. सोमवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. मंगळवारी सकाळी कोतवाली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
पीडित महिला आणि आरोपी यांच्यात यापूर्वी विवाद किंवा भांडण झालं होतं. याच कारणावरून एका आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला, तर उर्वरित तीन आरोपींनी तिला मारहाण करून गंभीर जखमी केलं. विशेष म्हणजे, आरोपी हे पीडितेचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.






एक आरोपी ताब्यात, तीन जण फरार
मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश उर्फ टाटा चव्हाण या चौघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी यापैकी डाळखुष काळे या आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर तिघे पसार आहेत. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !