शंभरीपार तरी दोघींनी कॅन्सरला दिली मात
वय 102 वर्ष असतानाही जळगावात झाली यशस्वी शस्त्रक्रिया अन् केमोथेरपी
Despite being over a hundred, both of them defeated cancer. जळगाव (16 जुलै 2025) : वयस्क रुग्णांवर उपचार, ते सुद्धा शंभरीपार महिलांवर कॅन्सरसारख्या आजाराच्या शस्त्रक्रिया व केमोथेरपी करणे याची क्वचितच नोंदी बघायला मिळतील परंतु अशाच दोन रुग्णांचे उपचार जळगावातच पूर्ण झाले आणि आज ते ठणठणीत आहेत. आता दोघांचे वय 104 वर्षे असून या वयातही कॅन्सरचा उपचार होऊ शकतो, हे बघता कॅन्सर रुग्णांच्या जीवनात नक्कीच उमेद निर्माण होईल. यामुळे कॅन्सर उपचारासाठी पुणे-मुंबईच्या फेर्या व तेथील खाजगी कॅन्सर रुग्णालयात येणार्या खर्चापासून सुद्धा बचत होत आहे.
तिसर्या स्तरावर पोहोचला होता जबड्याचा कॅन्सर
वहेदाबी यांच्या जबड्यातील कॅन्सर वाढून मानेपर्यंत तिसर्या स्तरावर पोहोचला होता. तेव्हा ही गाठ फुटल्यानंतर राहिलेले आयुष्य किती भयावह असेल, या भीतीने रुग्णाच्या नातेवाईकांनी जळगावात येऊन दाखविले. शस्त्रक्रिया करून कॅन्सरग्रस्त गाठ काढल्याशिवाय पर्याय नसल्याचे समजल्यावर नातेवाईक व रुग्णांनी धोका पत्करत शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याचे ठरविले. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत कॅन्सरग्रस्त जबडा व मानेतील गाठी काढून छातीच्या स्नायूद्वारे प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.





उग्र स्वरूपाचा होता ट्रिपल निगेटिव्ह स्तनाचा कॅन्सर
स्तनाच्या कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांत केमोथेरपीचा उपचार पूर्ण केला. आरोग्याविषयी जागरुक असलेल्या तुळसाबाईंना स्तनात गाठ झाल्याचे कळताच त्वरित त्याचे निदान केले. पहिल्याच स्तराची कॅन्सरची गाठ असल्याने उपचाराने पूर्णतः बरे होण्याची शाश्वती होती.
केवळ आठ दिवसांतच हॉस्पिटलमधून सुटी
आमच्या आईला जळगाव शहरातील चांडक कॅन्सर रुग्णालयात बायोप्सी ते सिटी स्कॅनपर्यंत सर्व तपासण्या व शस्त्रक्रियासुद्धा एकाच दिवशी पार पडली. केवळ आठ दिवसांतच हॉस्पिटलमधून सुटी झाली. पूर्ण उपचारात व्हेंटिलेटरची गरज किंवा बाहेरुन रक्त देण्याची गरज सुद्धा पडली नाही. जीवाची जोखीम स्वीकारली, परंतू आम्हाला सर्वोत रिझल्ट मिळाल्याचे समाधान आहे. त्यासाठी डॉ.निलेश चांडक आणि त्यांच्या टीमचे आभारी आहोत. रेडिएशन थेरपी घेणे शक्य नसल्याने गोळ्यांच्या माध्यमातून सहा महिने केमोथेरपीचे उपचार झाले. आता मागील दीड वर्षांपासून एकही गोळी नाही आणि नियमित खानपान सुरू असल्याचे डॉ.आर.यू.खान (रुग्णाचे पूत्र) म्हणाले.
जळगावातच झाली फास्ट ट्रॅक शस्त्रक्रिया
तासाभराच्या शस्त्रक्रियेमध्ये संपूर्ण स्तन काढून शस्त्रक्रिया झाल्यावर केवळ एकाच दिवसात हॉस्पिटलमधून सुटी झाली. शस्त्रक्रियेनंतर कसल्याच प्रकारचे इंजेक्शन किंवा सलाईन देण्याची गरज पडली नाही. केवळ वेदनाशामक गोळ्या गरजेनुसार घेण्याचे सांगितले. केवळ 35 किलो वजन असलेल्या आजींना शस्त्रक्रियेनंतर टाक्यांमध्ये जंतुसंसर्ग किंवा इतर काहीच त्रास झाला नाही. शिवाय कसल्याच प्रकारच्या ड्रेसिंगची गरज पडली नाही.
गोळ्यांच्या माध्यमातून केमोथेरपीच्या आठ फेरी पूर्ण
तुळसाबाई वजनाने कमी असल्या तरीही काटक आहेत. पहिल्या स्तराचा हा कॅन्सर ट्रिपल निगेटिव्ह म्हणजे उग्र स्वरुपाचा असल्याचे निष्पन्न झाले म्हणून गोळ्यांच्या माध्यमातून केमोथेरपीच्या आठ फेरी सुद्धा पूर्ण केल्याचे जळगावातील कॅन्सर तज्ज्ञ डॉ.चांडक म्हणाले.
