रेल्वे आरक्षण चार्ट आठ तासांपूर्वीच जाहीर : ऐनवेळी आलेल्या व्हीआयपी शिफारशींनाही ‘वेटिंग’चा धक्का
Railway reservation chart released eight hours in advance : Even VIP recommendations that came just in time were hit by ‘waiting’ भुसावळ (16 जुलै 2025) : रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षणाबाबत एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता रेल्वे प्रवासासाठीचा आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या आठ तास आधीच अंतिम केला जाणार आहे. या निर्णयामुळे ऐनवेळी येणार्या व्हीआयपी शिफारशींना चाप बसणार असून, वेळेत तिकीट काढणार्या सामान्य प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.नवीन नियमाची अंमलबजावणी 10 जुलैपासून झाली आहे.
यापूर्वी अनेकदा व्हीआयपी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या पत्रांमुळे शेवटच्या क्षणी वेटिंगवरील तिकिटे कोट्यामधून कन्फर्म केली जात होती. यामुळे सामान्य प्रवाशांना, ज्यांनी वेळेवर बुकिंग केले होते,त्यांना जागा मिळत नव्हती. या नव्या नियमानुसार, रेल्वे प्रवासाच्या चार तास आधी दुसरा चार्ट प्रसिद्ध केला जाईल, जो केवळ तिकिट रद्द करणार्या प्रवाशांच्या जागांवर आधारित असेल.मात्र,पहिला चार्ट 8 तास आधीच अंतिम झाल्यामुळे, त्यानंतर व्हीआयपी शिफारशीसाठी फारसा वाव राहणार नाही.





वशिलेबाजीला बसेल आळा
रेल्वेच्या या निर्णयामुळे मध्यस्थी आणि वशिलेबाजीला आळा बसेल,अशी अपेक्षा आहे तसेच प्रवाशांना आपल्या तिकिटाच्या स्थितीबद्दल अधिक लवकर माहिती मिळेल. ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंगवर आहे, त्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे वेळेवर तिकीट काढून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कनफर्म करणार्यांचे दिवस आता संपुष्ठात आले आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवासात पारदर्शकता वाढेल आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी चर्चा सध्या रेल्वे प्रवाशांमध्ये सुरू आहे. अनेक प्रवासी हे रेल्वेतील आपल्या परिचित व्यक्तींना हाताशी धरून वेळेवर तिकीट कन्फर्म करून घेत होते, हा प्रकार आता या निर्णयामुळे थांबणार आहे.
