पिस्टल, धारदार चाकूसह तरुणाला बेड्या

मालेगाव (16 जुलै 2025) : गावठी बनावटीचे पिस्टल, तीन काडतुसे व धारदार चाकूसह तरुणाला अटक करण्यात आली. रोहन श्रावण कुवर (40, रा. इंदिरानगर, दरेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
कुवर हा सायणे शिवारातील हॉटेल बॉम्बे बार, चाळीसगाव फाटा परिसरात बेकायदेशीररीत्या पिस्तूल व धारदार चाकू घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांच्या पथकाने हॉटेल बॉम्बे बारमध्ये छापा टाकून कुंवर यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत रोख 12 हजार 700 रुपये, पिस्तूल, काडतूसे व चाकू मिळाला. कुंवर याला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.