भुसावळातील बीएलओंची वाढली अडचण : 63 दांडी बहाद्दरांना नोटीसा बजावल्याने खळबळ

भुसावळ (17 जुलै 2025) : सर्व बीएलओ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून दुबार मतदारांची नावे तत्काळ कमी करावे, स्थलांतरीत, मृत मतदार, नवीन मतदारांची नोद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी जितेद्र पाटील यांनी केले. येथील प्रांताधिकारी कार्यालयात आयोजीत केलेल्या बीएलओ यांच्या बैठकीत 63 बीएलओ यांनी दांडी मारली यामुळे अश्या 63 दांडीबाज बीएलओ यांना शोकॉज नोटिस बुधवारी बजाविण्यात आली आहे.
काय घडले भुसावळात
आगामी पालिका निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांच्या निवडणूका होत आहे. यामुळे महसूल प्रशासन कामाला लागले आहे. याच पार्श्वभुमीवर येथील प्रांताधिकारी कार्यालयात बीएलओ यांच्या बैंठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सर्व बीएलओ यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र, 63 बीएलओ यांनी दांडी मारल्याने अश्या गैरहजर बीएलओ यांना बुधवारी नोटिसा प्रांताधिकारी कार्यालयाने काढल्या आहे.

बीएलओ यांच्या बैठकीला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भुसावळ मुख्याधिकारी राजेंद्र फातलेसह वरणगाव मुख्याधिकारी सचीन राऊत उपस्थित होते. यावेळी बीएलओ यांना विविध सूचना प्रांत पाटील यांनी दिल्यात.
भौतीक परिस्थितीचा आढावा घ्यावा
भुसावळ मतदार केंद्रातील सर्व मतदान केद्रांना बीएलओ यांनी भेटी देऊन तेथील भौतीक परिस्थितीचा आढावा घ्यावा, मतदान केंद्रात उजेड आहे का नाही, पंखे, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग, अपंग मतदारांना मतदान केद्रात जाण्याची व्यवस्था आहे का नाही, याची पाहणी करावी, या सर्व प्रकाराची पहाणी करून तसा आढावा अहवाल सादर करावा, अश्या सूचना केल्या.
