चाळीसगावात अडीच लाखाचा गांजा जप्त : चौकडी जाळ्यात

Ganja worth 2.5 lakh seized in Chalisgaon : Four arrested चाळीसगाव (19 जुलै 2025) : बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाची वाहतूक करणार्या चौकडीवर चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई करीत 14 लाख 57 हजार 416 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवार, 17 रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.
तपासणी करताना सापडला गांजा
गुरुवार, 17 रोजी रात्री 1 ते 3 वाजे पावेतो संशयीत वाहनांची तपासणी करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वरिष्ठांच्या आदेशान्वये नाकाबंदी सुरू असताना रात्री 2.50 वाजता भडगावकडुन नांदगावकडे जाणारे क्रुझर वाहन (एम.एच. 18 बीक्स .8943) आली असता पथकातील अधिकार्यांनी वाहन तपासल्यानंतर त्यात सीटाखाली प्लॅस्टीकच्या थैल्या आढळल्याने त्याची तपासणी केली असता दोन लाख 57 हजार 416 रुपये किंमतीचा 32 किलो 177 ग्रॅम वजनाचा व अमली पदार्थ गांजा मिळुन आला.

चौकडीला पोलिसांकडून बेड्या
वाहनातील राहुल पहाड्या पावरा (23), अक्तारसिंग शिवदास पावरा (24), रवींद्र पंडीत पावरा (20), पहाडसिंग कुमार पावरा (24, सर्व रा.महादेव दोडंवाड, ता.शिरपूर, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली. कॉन्स्टेबल पवन पाटील यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत.
हा मुद्देमाल जप्त
या गुन्ह्यात दोन लाख 57 हजार 416 रुपये किंमतीचा 32 किलो 177 ग्रॅम वजनाचा व अंमली पदार्थ गांजा व 12 लाख रुपये किंमतीची पांढर्या रंगाची क्रूझर गाडी मिळून 14 लाख 57 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलिस उपअधीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात एपीआय भरत चौधरी, हवालदार भुपेश वंजारी, हवालदार नितीन कोल्हे, नितीन वाल्हे, हवालदार विनोद पाटील, पवन पाटील, निलेश पाटील, प्रवीण पवार, प्रथमेश पाटील, दीपक चौधरी, विजय महाजन आदींच्या पथकाने केली.
