श्री विठ्ठल नामाचा जयघोष : जामनेर परिसरातील चार हजार भाविक भुसावळातून पंढरपूर रवाना

मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था


Chanting the name of Shri Vitthal : Four thousand devotees from Jamner area leave for Pandharpur from Bhusawal भुसावळ (20 जुलै 2025) : जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे चार हजार भाविक शनिवारी रात्री विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरला रवाना झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी या गाडीची व्यवस्था केली होती. यावेळी भाविकांना निरोप देण्यासाठी स्वतः मंत्री महाजन उपस्थित होते. भाविकांनी यावेळी श्री विठ्ठल नामाचा जयघोष केला. शनिवारी रात्री 9.40 वाजता रवाना झालेली ही गाडी रविवारी सकाळी पंढरपूर येथे दाखल झाली.

22 डब्यांची विशेष गाडी
15 दिवसांपूर्वी सुद्धा भुसावळ येथून सुटलेल्या विशेष रेल्वे गाडीने 1300 पेक्षा जास्त भाविक पंढरपूरला गेले होते. आता शनिवारी मंत्री महाजन यांनी 22 डब्यांची विशेष गाडी बुक करून भाविकांना पंढरपूर रवाना केले. जामनेर येथून 60 बसेस, 100 क्रुझरसह अन्य वाहनांनी हे भाविक भुसावळ रेल्वे स्थानकापर्यंत आले. सर्वांनी स्थानकांवर विठुरायाचा जयघोष केला. रात्री आठ वाजेपासून स्थानकावर भाविकांची गर्दी वाढली. रात्री 9 वाजेपर्यत भुसावळ जंक्शनला जणू यात्रेचे स्वरुप आले. भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले व सहकार्‍यांनी रस्त्यावर थांबून वाहतूक व्यवस्था चोख ठेवली होती.


असा होईल गाडीचा प्रवास
शनिवारी रात्री 9.40 वाजता सुटलेली भुसावळ ते पंढरपूर विशेष गाडी रविवारी सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचेल. यानंतर रविवारी रात्री 9.15 वाजता पंढरपूर येथून निघून ही गाडी सोमवारी सकाळी आठ वाजता भुसावळ जंक्शनवर येईल.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !