लग्नाच्या आमिषातून अल्पवयीन तरुणी गर्भवती

जळगाव (20 जुलै 2025) : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला व त्यातून ती गर्भवती राहिली. याप्रकरणी शनिवार, 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काय घडले जळगावात
एका भागातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मागील एक वर्षांपासून निखील लिलाधर कोळी (20, रा.मोहन टॉकीजजवळ, जळगाव) याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या वेळोवेळी अत्याचार केला.

या अत्याचारातून पीडीता पाच महिन्याची गर्भवती असल्याचे 18 जुलै रोजी उघडकीला आले. या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. शनिवार, 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता संशयीत आरोपी निखील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.
