नंदुरबारात साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त


वाळूच्या डंपरद्वारे निझर ते नंदुरबार वाहतूक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नंदुरबार : लॉक डाऊनच्या काळात वाळूच्या डंपरमधून सुमारे साडे नऊ लाख रुपयांचा गुटख्याची वाहतूक करतांना चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवारीअटक केली आहे. गुजरात राज्यातील निझर येथून हा विमल गुटखा नंदुरबारला आणला जात असल्याचे सांगण्यात आले. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने डंपर पकडून कारवाई केली. गुटखा विक्री करणारा निझर येथील व्यापारी असल्याची माहिती आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !