पंजाब मेलमध्ये मोबाईल चोरी : चोरटा भुसावळ आरपीएफच्या जाळ्यात


Mobile phone theft in Punjab Mail: Thief in Bhusawal RPF net भुसावळ (20 जुलै 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ( 12137) पंजाब मेलमध्ये मोबाईल चोरी करणार्‍या एका संशयीताला जळगाव स्थानकावर पकडले. संशयीताकडून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला.

यांनी केली कारवाई
वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या देखरेखीखाली नरेंद्र परदेशी, विनोद जेठावे, भुसावळचे अमोल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


फिर्यादीने आरपीएफ जळगावशी संपर्क साधून ते भोपाळ प्रवासादरम्यान आपला आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची माहिती दिली होती. यानंतर आरपीएफने तत्काळ भोपाळ येथील आरपीएफशी समन्वय साधत लोहमार्ग पोलिस, भोपाळ येथे गुन्हा दाखल केला. नंतर हे प्रकरण जीआरपी भुसावळकडे हस्तांतरित झाले. संशयीताने चोरीची कबुली दिली. तपास लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !