पाचोर्यात नूतन निरीक्षक अॅक्शन मोडवर : अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना छापेमारीत 21 सिलिंडर जप्त
New inspector in Pachorya on action mode : 21 cylinders seized in raid while refilling gas illegally पाचोरा (21 जुलै 2025) : पाचोरा पोलिस ठाण्याची धूरा नूतन पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी स्वीकारल्यानंतर अवैध धंद्याविरोधात मोहिम उघडली आहे. नूतन निरीक्षकांच्या धडक कारवाईने धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असताना पथकाने छापेमारी करीत 21 गॅस सिलेंडरसह 85 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा शहरात घरगुती गॅसचा कमर्शियल वापर करीत त्याचा इंधन म्हणून वाहनात भरण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिसांना प्राप्त झाली होती. हा प्रकार जारगाव चौफुलीजवळ एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असल्याची माहिती पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. शुक्रवार, 18 जुलै रोजी दुपारी तीन वाजता याठिकाणी धाड टाकताच शहरात खळबळ उडाली.





पथकाने घरगुती वापराच्या गॅस 21 गॅस सिलिंडसह वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक मशीन (मोटार) व इतर साहित्यासह 85 हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
संशयित शेख शहेबाज शफुद्दीन (रा. नुरानीनगर, पाचोरा) याला अटक करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील, रणजीत पाटील, संदीप राजपूत, संदीप भोई, गणेश राऊळ यांच्यासह पथकाने केली.
